कौटूंबिक वादातून पत्नीवर कुर्‍हाडीने हल्ला करीत पतीची रेल्वेखाली आत्महत्या


Husband commits suicide under train after attacking wife with axe over family dispute जळगाव (20 ऑगस्ट 2025) : कौटूंबिक वाद उफाळल्यानंतर संतप्त पतीने दारूच्या नशेत पत्नीवर कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला केला व नंतर स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी सकाळी सातवाजता जळगाव तालुक्यातील बोरनार येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण
आनंदा महारू धनगर (42) हे आपल्या पत्नी रेखा आणि विनोद आणि पप्पू या दोन मुलांसह जळगाव तालुक्यातील बोरनार येथील प्लॉट एरिया परिसरात राहतात.






मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजता आनंदा यांचे पत्नी रेखासोबत किरकोळ वाद झाला. हा किरकोळ वाद विकोपाला जाऊन वाढतच जात असताना या वादातून आनंदाने त्याची पत्नी रेखावर लोखंडी कुर्‍हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात रेखा धनगर गंभीर जखमी झाल्या. त्यांना लागलीच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती मात्र चिंताजनक आहे.

आनंदा धनगर यांनी पत्नीवर हल्ला केल्यानंतर लागलीच सकाळी सात वाजता थेट म्हसावद रेल्वे गेटजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात जळगाव एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !