जळगावातील हॉटेल तारामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असताना छापा : हॉटेल मालकासह पाच अटकेत


Raid while prostitution was going on in Hotel Tara in Jalgaon जळगाव (21 ऑगस्ट 2025) : शहरातील एमआयडीसीतील एच सेक्टरमधील हॉटेल तारा येथे सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका केली. या कारवाईत हॉटेल मालकासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहिती अन दोन वेळा लाईट चालू-बंदचा इशारा
एमआयडीसी परिसरात एच.ेक्टरमध्ये हॉटेल तारा येथे काही महिलांकडून देहविक्रयचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार एएचटीयू पथकाने बुधवारी सायंकाळी सापळा रचला. हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून त्याने खोलीत गेल्यावर लाईट दोन वेळा बंद सुरू करण्याचा सिग्नल देण्याचे ठरले. त्यानुसार सिग्नल मिळताच पथकाने छापा टाकला. हॉटेलमधून तीन महिलांची सुटका केली. पथकाने हॉटेल मालक योगेश देवरे याच्यासह दोन कर्मचारी व दोन ग्राहक अशा पाच जणांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.




तिन्ही महिला बांगलादेशी
सुटका केलेल्या तिन्ही महिलांकडे कोल्हापूरचा पत्ता असलेले आधार कार्ड पोलिसांना सापडले मात्र त्यांना भारताचे राष्ट्रगीत माहित नाही. ते म्हणता येत नाही. मराठी व हिंदी बोलता येत नाही. यावरून त्या बांगलादेशी असण्याची शक्यता आहे.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !