मुंबईतील पावसाचा फटका : 12 गाड्या दोन ते 11 तास धावताय विलंबाने
Mumbai rains: 12 trains running late by two to 11 hours भुसावळ (21 ऑगस्ट 2025) : मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे गाड्यांना बसला आहे. परिणामी मुंबईकडून भुसावळकडे येत असलेल्या तब्बल 12 गाड्या दोन ते 11 तास विलंबाने धावत होत्या. या विलंबामुळे प्रवाशांचे हाल होत असून अनेक प्रवाशांना स्थानकांवर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. आरक्षण तिकीटे काढून गाडी येत नसल्याने प्रवाशांची मोठीच गैरसोय झाली.
प्रवाशांना मनस्ताप
मंगळवारी दुपारपासूनच परिस्थिती गंभीर झाली आहे. भुसावळसह अन्य स्थानकांवर प्रवाशांनी आपल्या गाड्यांची वाट पाहत वेळ काढला.अनेक ठिकाणी तर प्रवासी थेट प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पहात झोपून गेले होते. प्रवाशांच्या हालअपेष्टांची स्थिती पाहता रेल्वे प्रशासनाने अधिकृत माहिती देत गाड्यांचे वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी रेल्वे स्थानकावर गाड्यांची वाट पहात बहूसंख्य प्रवासी थांबून राहीले होते. संबंधित गाड्यांचे आरक्षण पूर्वी दोन महिने अगोदरच केल्याने त्या गाडीशिवाय पर्याय नसल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर थांबून गाडीची वाट पहावी लागली.





पावसामुळे मुंबईकडे जाणार्या अनेक गाड्या या विलंबाने मुंबईत पोचल्यात, काही गाडी नाशिक, ईगतपुरी, मनमाड येथेच शॉर्ट टर्मिनेट केल्याने प्रवाशांचे तेथून मुंबईत जाण्यासाठी हाल झाले. परिणामी बुधवारी मुंबईकडून भुसावळकडे येणार्या रेल्वे गाड्या या लेट लतिफ झाल्या होत्या.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पावसाचा परिणाम ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणांवर झाल्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिस्थिती सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेची अद्ययावत माहिती घेणे गरजेचे आहे.
विलंबित गाड्यांची यादी
12141 पाटलीपुत्र एक्सप्रेस 9 तास, 12322 हावडा मेल 11 तास, 11057 अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस 11 तास, 15945 गुवाहाटी सुपरफास्ट एक्स्प्रेस 5.30 तास, 11055 गोदान एक्सप्रेस 3.30 तास, 11061 पवन एक्सप्रेस 3.30, 22109 बल्लारशाह एक्सप्रेस 10.12167 बनारस हमसफर – एक्स्प्रेस 9.30, 12261 हावडा दुरंतो एक्स्प्रेस 11, 20103 गोरखपूर एक्सप्रेस 7.30,12362 आसनसोल एक्सप्रेस 2.30, 22183 कुशीनगर साकेतधाम एक्सप्रेस 7.40 लेट धावत होत्या.
