शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी गुड न्यूज : ऑगस्टचा पगार पाच दिवस आधी खात्यात जमा होणार


Good news for government officials and employees: August salary will be deposited in the account five days early मुंबई (21 ऑगस्ट 2025) : आगामी गणेशोत्सव सणाचा उत्साह पाहता ऑगस्ट महिन्याचा पगार पाच दिवस आधीच बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. उत्सव काळात आर्थिक अडचणींचा सामना न करावा लागण्यासाठ ऑगस्ट महिन्याचे वेतन 26 ऑगस्ट रोजीच देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने सरकारी कर्मचार्‍यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.

राज्य शासनाने घेतला निर्णय
राज्य सरकारकडून शासन निर्णय काढून 1 सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकार्यांचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारकांन / कुटुंब निवृत वेतन धारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे त्यामुळे या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला तब्बल पाच दिवस आधीच आपला पगार मिळणार आहे. त्यामुळे, गणेशोत्सव काळाती खर्चासाठी खिसा गरम आणि हात ढिला होणार आहे.




गणेशोत्सवात पाच दिवस 12 वाजेपर्यंत परवानगी
आगामी गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत देखावे दाखवण्यासाठी शेवटचे पाच दिवस दिले जाणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे दिली आहे. याबाबतचा आदेश लवकरच मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत, असेही ते म्हणाले.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !