अंजली दमानियांचा खळबळजनक दावा : घोटाळ्याची फाईलच धनंजय मुंडेंनी गायब केली


Anjali Damania’s sensational claim: Dhananjay Munde made the scam file disappear मुंबई (21 ऑगस्ट 2025) : धनंजय मुंडे यांच्या अडचणी थांबायला तयार नाहीत. आरोपांच्या फैरी त्यांच्याविरोधात शांत झाल्या नाही तोच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी कृषी विभागातल्या भ्रष्टाचाराची आणि गौडबंगालाची फाइल गायब केल्याचा आरोप वजा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण
कृषी सचिव व्ही. राधा यांनी मंत्र्यांना कृषी विभागातल्या भ्रष्टाचाराची फाईल पाठवली होती. हीच फाईल धनंजय मुंडे यांनी गायब केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांच्या आरोपावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया अद्याप तरी आलेली नाही.




काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अंजली दमानिया यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. त्यात त्या म्हणतात की, ’मॅडम व्ही. राधा या कृषी सचिव असताना, कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गौडबंगालाच्या रिपोर्टची फाइल मंत्र्यांना पाठवली. ही फाईल धनंजय मुंडे यांनी गायब केली. आज लोकायुक्तांच्या सुनावणी दरम्यान मी हे लोकायुक्तांपुढे मांडल्यानंतर, प्रतिभा पाटील नावाच्या उपसचिवांनी लोकायुक्तांना कन्फर्म केले, की ही फाईल मंत्र्यांना दिल्याचा जावक क्रमांक आहे, पण ही फाईल त्यांच्याकडून राजीनाम्यानंतर परत आली नाही. धनंजय मुंडे यांना लेखी उत्तर देण्याचे आदेश लोकायुक्तांकडून देण्यात आले आहेत. आत्ता 5 मिनिटापूर्वी मला शासनाकडून हे पत्र पाठवण्यात आले आहे.’













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !