एरंडोलजवळ ट्रकच्या धडकेने महंत प्रियरंजनदास ठार : संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
Mahant Priyaranjan Das killed in truck collision near Erandol : Angry villagers block road एरंडोल (22 ऑगस्ट 2025) : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पिंपरी बुद्रुक येथील महंत प्रियरंजनदास गुरु आचार्य महान साहेब (35) हे जागेवर ठार झाले तर सहकारी प्रवीण नारायण पाटील (23) हे जखमी झाले. हा अपघात एरंडोलजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजता घडला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी समांतर रस्त्यासह गतिरोधकासाठी महामार्ग रोखून धरल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.
अधिकार्यांनी काढली समजूत
अपघातानंतर ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरल्याने तहसीलदार प्रदीप पाटील व एरंडोल पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी धाव घेतली व ग्रामस्थांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली.





घटनास्थळी यापूर्वी देखील अनेक वेळा गंभीर अपघात घडलेले असल्याने ग्रामस्थांनी यापूर्वी नॅशनल हायवे ऑफ इंडियाचे प्रकल्प अधिकारी यांना वारंवार स्पीड ब्रेकर व समांतर रस्ते तयार करण्यासंदर्भात निवेदन दिली आहे तथापि त्यावर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.
त्याबाबत तहसीलदार प्रदीप पाटील यांनी घटनास्थळावरून प्रकल्प अधिकारी साळुंखे यांच्याशी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत चर्चा केली व ग्रामस्थांच्या मागण्या तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात सूचित केले.
