औषध कंपनीत नायट्रोजन वायूची गळतीने चार कामगारांचा मृत्यू

पालघरमधील घटना : दोघांची प्रकृती गंभीर


Four workers die in nitrogen gas leak at pharmaceutical company मुंबई (22 ऑगस्ट 2025) : नायट्रोजन वायूची गळती झाल्याने त्यात गुदमरून चार कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील मेडले फॉर्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीत गुरुवारी संध्याकाळी उशिरा घडली. या घटनेत दोघांची प्रकृती गंभीर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मृतांमध्ये कमलेश यादव, कल्पेश राऊत, धीरज पवार आणि बंगाली ठाकूर यांचा समावेश असून रोहन शिंदे आणि नीलेश आदळे यांची प्रकृती गंभीर आहे.




काय घडले नेमके ?
बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरात असलेल्या कंपनीच्या प्लँट क्रमांक एफ-13 मध्ये औषध निर्मिती प्रक्रिये दरम्यान नायट्रोजन वायूची गळती झाली. अपघातानंतर फार्मा कंपनीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी काम करणारे कामगार कंपनी सोडून पळू लागले. कंपनीतून बाहेर पडलेल्या लोकांनी सांगितले की, नायट्रोजन गॅसची अचानक गळती झाली.

पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरात असलेल्या मेडले (मेडली) फॉर्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीत गुरुवारी संध्याकाळी उशिरा एक मोठा अपघात झाला. कंपनीच्या प्लँट क्रमांक एफ-13 मध्ये औषध निर्मिती प्रक्रिये दरम्यान सहा कामगारांना नायट्रोजन वायू गळतीचा त्रास झाला. या अपघातात गुदमरून चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फार्मा कंपनीत अल्बेंडाझोल औषध तयार केले जात होते. या दरम्यान नायट्रोजन वायू मिसळताना अचानक गळती झाली. वायूच्या संपर्कात आल्यानंतर कामगार बेशुद्ध पडले. त्यांना ताकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. अपघातानंतर कंपनी परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !