जळगावात धाडसी घरफोडी : 1.29 लाखांचा मुद्देमाल लंपास
Bold house burglary in Jalgaon : Property worth Rs 1.29 lakhs looted जळगाव (22 ऑगस्ट 2025) : जळगाव शहरातील शांतीनिकेतन परिसरात राहणारे एक वृद्ध दांपत्य पुण्यात मुलाकडे गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरातून दागिने आणि रोकड असा एकूण एक लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
खिडकीचे ग्रील वाकवून घरात प्रवेश
शांतीनिकेतन नगर येथे राहणारे शंकर रामचंद्र इंदानी (वय 69) हे आपल्या पत्नीसोबत 13 ऑगस्टपासून पुण्यात मुलाकडे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी डाव साधला. बुधवारी, 20 ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना समोर आली. चोरट्यांनी घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लाकडी कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख 29 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.





