जळगावात दोन हद्दपार आरोपींना बेड्या


Two deported accused shackled in Jalgaon जळगाव (22 ऑगस्ट 2025) : जळगावात हद्दपार आदेशाचे उल्लंघण करीत डेरा मांडलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे तेजस दिलीप सोनवणे आणि सागर ऊर्फ बीडी सुरेश सपकाळे हे आणि सध्या तडीपार आहेत. मात्र, 20 ऑगस्टला संध्याकाळी पेट्रोलिंग दरम्यान पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना माहिती मिळाली की, तेजस आणि सागर हे तडीपार आरोपी अजूनही राहत्या घरी वास्तव्य करीत आहेत.






पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह गणेशकुमार नायकर, दिपक गजरे, शशिकांत पाटील, गणेश ढाकणे, नवजीत चौधरी, काजोल सोनवणे यांच्या पथकाने तत्काळ रवाना होवून छापा टाकला असता आरोपी आपल्या घरात मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दपार आरोपी स्वप्नील ऊर्फ गोल्या धर्मराज ठाकुर हा देखील शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत डी.एन.सी कॉलेज परिसरात गावठी पिस्तूलसह दहशत माजवित असताना मिळुन आला होता. त्याच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !