दोन हजारांची लाच भोवली : भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील दोन एएएसआयसह खाजगी पंटर जाळ्यात

गणेश वाघ
Two thousand rupees bribe : Two constables of Bhusawal Taluka Police Station caught by Jalgaon AC
भुसावळ (22 ऑगस्ट 2025) : अटक वॉरंट न बजावता सहकार्य करण्यासाठी दोन हजारांची लाच खाजगी पंटराच्या माध्यमातून स्वीकारताना भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील दोन एएसआय यांना जळगाव एसीबीने अटक केली आहे. शुक्रवार, 22 रोजी दुपारी झालेल्या या कारवाईने जळगाव पोलिस दलातील लाचखोर हादरले आहेत.
एएसआय बाळकृष्ण मुकुंदा पाटील (55), एएसआय आत्माराम सुधाकर भालेराव (57) व खाजगी पंटर ठाणसिंग प्रतापसिंग जेठवे (42, . शिवपूर कन्हाळा, ता.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
असे आहे लाच प्रकरण
47 तक्रारदाराविरोधात खामगाव कोर्टात भादंवि 138 प्रमाणे चेक बाऊन्सची केस दाखल आहे. तक्रारदारा विरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर वॉरंटची अंमलबजावणी न करण्यासाठी तसेच अटक वॉरंट कॅन्सल करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा मोबदल्यात एएसआय बाळकृष्ण पाटील यांनी पाच हजारांची लाच मागितली होती व 21 रोजी तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर पडताळणी केल्यानंतर बाळकृष्ण पाटील व सुधाकर भालेराव यांनी दोन हजारांची लाच मागणी केल्याचे स्पष्ट होताच सापळा रचण्यात आला.
गुरुवारी आरोपींच्या सांगण्यावरून खाजगी पंटराने लाच स्वीकारताच तिघांना अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार किशोर महाजन, पोलिस नाईक बाळू मराठे, प्रदीव पोळ, कॉन्स्टेबल भूषण पाटील, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.