भुसावळात दोन लाखांच्या गांजासह मध्यप्रदेशातील संशयीत जाळ्यात

जळगाव गुन्हे शाखेसह बाजारपेठ पोलिसांची संयुक्त कारवाई : तस्कर हादरले


Suspect from Madhya Pradesh caught with ganja worth two lakhs in Bhusawal भुसावळ (22 ऑगस्ट 2025) : गांजा तस्कराच्या मुसक्या यंत्रणेने संयुक्त कारवाईत आवळत सुमारे दोन लाखांचा गांजा जप्त केला. या प्रकरणी अनारसिंग वालसिंग भिलाला (30, रा.शमलकोट, ता.झिरण्या जि.खरगोन, मध्यप्रदेश) या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे हवालदार गोपाळ पोपट गव्हाळे यांना गांजा तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळताच त्यांनी वरिष्ठांना सूचित केले व सापळा रचण्यात आला. बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतील हॉटेल सुरुची इन समोर सर्व्हिस रस्त्यावर संशयीत होडा शाईनवर (एम.पी.09 व्ही.एम.4395) येताच त्यास शुक्रवार, 22 रोजी पहाटे दोन वाजता अडवण्यात आले व आरोपीच्या दुचाकीवरील गोणीतून दोन लाख पाच हजार पाचशे रुपये किंमतीचा व 10.275 किलो ग्रॅम वजनाचा गांजा तसेच 10 हजारांचा मोबाईल मिळून दोन लाख 90 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कॉन्स्टेबल विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.




गोपनीय माहितीवरून कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील, बाजारपेठ पोलिस राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे एपीआय नितीन पाटील, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेडेडे पीएसआय रवी नरवाडे, हवालदार गोपाळ गव्हाळे, संदीप चव्हाण, उमाकांत पाटील, नाईक विकास सातदिवे, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, चालक कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल हर्षल महाजन, कॉन्स्टेबल परेश बिर्‍हाडे आदींच्या पथकाने केली.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !