भुसावळात बामसेफचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी
अधिवेशनात ओबीसींची जातीनिहाय जनगणना, शेतकरी, कामगारांवर चर्चा

Bamsafe state-level convention in Bhusawal on Sunday भुसावळ (22 ऑगस्ट 2025) : शहरातील शांतीनगरातील कमल गणपती हॉलमध्ये 39 वे बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे राज्य अधिवेशन येत्या रविवार, 24 ऑगस्ट रोजी येथे होणार आहे. येथील कमल गणपती हॉलमध्ये सकाळी 10.30 ते संध्याकाळी 7 या वेळेत हे अधिवेशन पार पडणार असून राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
यांची असेल उपस्थिती
या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम (नवी दिल्ली) भूषविणार असून उद्घाटन कॉ. किशोर ढमाले (महाराष्ट्र राज्य संघटक, सत्यशोधक शेतकरी सभा), डॉ. मगन ससाणे (राष्ट्रीय अध्यक्ष,अॅड. राजेश झाल्टे (जेष्ठ विधी तज्ञ), व्ही.व्ही. जाधव (राष्ट्रीय उपाध्यक्ष, बामसेफ), दिपक वासनिक (राष्ट्रीय समीक्षा प्रभारी, बामसेफ) आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या विषयांवर होणार चर्चा
अधिवेशनात ओबीसींची जातीनिहाय जनगणना, शेतकरी व कामगारांचे मूलभूत प्रश्न,अनुसूचित क्षेत्रांचे संरक्षण,धार्मिक ध्रुवीकरणातून बहुजनांचे विभाजन आदी गंभीर मुद्यांवर सखोल चर्चा होणार आहे. तसेच दुपारच्या दुसर्या सत्रातईव्हीएमचा गैरवापर,बहुजन समाजातील संघटनात्मक जाळे,धनगर व मराठा समाजातील प्रश्नांचा गैरवापर यासह विविध सामाजिक व राजकीय विषयांवर विचारमंथन होणार आहे.
या अधिवेशनात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा,प्रोटॉन,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा,आरपीआय, सामाजिक कार्यकर्ते,विचारवंत,प्राध्यापक,वकील,संशोधक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. राज्य अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र बामसेफ व सहयोगी संघटनांनी तयारी केली असून, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.