दिड लाखांची लाच भोवली : सहाय्यक फौजदारासह दोघे जाळ्यात

Bribe scam of Rs 1.5 lakh : Two including assistant police officer caught अहिल्यानगर (22 ऑगस्ट 2025) : गांजाच्या केसमध्ये आरोपी न करता साक्षीदार करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोड करीत दिड लाखांची लाच स्वीकारताना कोतवाली पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे (57, समर्थ नगर सावेडी, जि.अहिल्यानगर) व खाजगी पंटर अशोक गायकवाड खाजगी (71, बिशोब लॉईड कॉलनी सावेडी, जि.अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली. या कारवाईने पोलिस वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
असे आहे लाच प्रकरण
38 वर्षीय तक्रारदाराला कोतवाली पोलिसात गांजा केसमध्ये आरोपी न करता साक्षीदार करण्याच्या मोबदल्यात कोतवाली पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी 20 जुलै 2025 रोजी तक्रारदाराकडे तडजोडीअंती दिड लाखांची लाच मागितली. या मागणीला सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी प्रोत्साहन दिल्याचे लाच मागणी कारवाईदरम्यान स्पष्ट झाले. दरम्यान, 18 व 20 रोजी लाच पडताळणी करण्यात आली व सापळा रचण्यात आल्यानंतर गुरुवार, 21 रोजी राजेंद्र गर्गे यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.