अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उद्या जळगाव दौर्यावर

Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal to visit Jalgaon tomorrow जळगाव (23 ऑगस्ट 2025) : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) हे रविवार, 24 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौर्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत विविध कामांचे लोकार्पण होईल.
रविवारी सकाळी 9 वाजता चाळीसगावकडे मोटारीने प्रयाण केल्यानंतर सकाळी 11 वाजता अंधशाळेजवळ, भडगांव रोड, चाळीसगाव येथे महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीस्मारक लोकार्पण सोहळ्यास उपस्थितील देतील.
दुपारी एक वाजता ललित बंगला, गणेश रोड, चाळीसगाव येथे आगमन करून वेळ राखीव तसेच दुपारी दोन वाजता ते द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर, पिपळवड-म्हाळसा, ता.चाळीसगाव येथे आगमन करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती देतील तसेच दुपारी 2.45 वाजता मोटारीने नाशिककडे प्रयाण करतील.