राज्यस्तरीय फ्लोवर बॉल स्पर्धेत गोदावरी सीबीएसईची चमकदार कामगिरी


Godavari CBSE’s brilliant performance in the state-level floorball competition जळगाव (23 ऑगस्ट 2025) : राज्यस्तरीय फ्लोवर बॉल स्पर्धेत गोदावरी स्कूलने द्वितीय क्रमांक पारीतोषीक मिळवत चमकदार कामगिरी केली. यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत गोदावरी स्कूलचे विघ्नेश पाटील, निर्भय सावकारे, नितीन मोरया, जुनेद शेख, अप्रतिम कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.




प्रशिक्षक मयूर पाटील त्यांचे मार्गदर्शन लाभले.संपूर्ण राज्यातून आलेल्या स्पर्धकांमध्ये अप्रतिम खेळ, आत्मविश्वास व संघभावना दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.त्याच्या या यशाचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, संचालिका डॉ.वर्षा पाटील, सचिव डॉ. केतकी पाटील, हृदयरोगतज्ञ डॉ. वैभव पाटील, स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांनी मुलांचे अभिनंदन करताना सांगितले की, विद्यार्थ्याने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !