फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणीसाठी जळगावातील अर्शिया व पार्थची निवड

Arshiya and Parth from Jalgaon selected for the football national competition selection test जळगाव (24 ऑगस्ट 2025) : राजमाता जिजाबाई ट्रॉफी फुटबॉल महिला राष्ट्रीय स्पर्धा (खुला गट) गुजरात येथे 14 सप्टेंबरपासून होत आहेत. त्यासाठी प्रारूप महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात आला असून त्यात जळगावची अर्शिया तडवी या एकमेव खेळाडूंची निवड झाली. तिचे प्रशिक्षण शिबिर 25 ऑगस्टपासून कुपरेज फुटबॉल मैदान, मुंबई येथे होणार असल्याने आर्शिया तडवीला फुटबॉल संघटनेतर्फे निरोप देण्यात आला.
नुकत्याच शिरपूर येथे 14 वर्षातील मुलांच्या आंतर जिल्हा स्पर्धेत सुद्धा महाराष्ट्र संघासाठी प्रारूप निवड करण्यात आली.त्यात सुद्धा जळगावचा पार्थ पाटीलची निवड झाली. त्याचे सुद्धा प्रशिक्षण शिबिर उपरे येथे लवकरच सुरू होणार आहे.
निवड झालेल्या दोघा खेळाडूंना जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख व मुख्य प्रशिक्षक राहील अहमद सह चिमुकला खेळाडू अली उमर यांनी शुभेच्छा दिल्या.
दोघी खेळाडूंचे संघटनेचे मुख्य आश्रयदाते अशोक जैन, संघटनेचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, कार्याध्यक्ष डॉ.अनिता कोल्हे, वरिष्ठ उपाध्यक्ष उद्योगपती जफर शेख व इम्तियाज शेख, खजिनदार शेखर देशमुख, सहसचिव छाया बोरसे संचालक ताहेर शेख, मनोज सुरवाडे व भास्कर पाटील आदींनी अभिनंदन केले.