मोदी सरकारच्या जातनिहाय जनगणणेच्या निर्णयामुळे वंचित समाज घटकांना न्याय मिळणार : मंत्री छगन भुजबळ

चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा उत्साहात


Minister Chhagan Bhujbal चाळीसगाव (24 ऑगस्ट 2025)  : देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतलेला जात जनगणनेचा निर्णय सर्व समाजांसाठी क्रांतिकारी असून या जात जनगणनामुळे वंचित घटकाला न्याय मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ यांनी केले आहे. चाळीसगाव येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत व अन्न – नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात लोकार्पण झाले. याप्रसंगी भुजबळ बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी खासदार स्मिताताई वाघ, विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार साहेबराव घोडे, आजी माजी लोकप्रतिनिधी, महात्मा फुले स्मारक समितीचे सदस्य व पदाधिकारी, माळी समाज पदाधिकारी व तालुक्यातील फुले प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




तर अशक्य काहीच नाही : मंत्री गिरीश महाजन
योग्य नेतृत्व, ठाम भूमिका आणि सकारात्मक शासन असेल तर अशक्य काहीच नाही. असे यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, स्मारक म्हणजे केवळ इतिहासाचा सन्मान नाही, तर पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणेचं शिलालेख आहे. तरुणांना आवाहन आहे, ज्यांनी अंधार हटवला त्यांना आठवा, ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं त्यांचा विचार जपा. ही मशाल पुढे नेणं आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. असेही यावेळी बोलताना मंत्री महाजन यांनी सांगितलं.

मंत्री भुजबळांनी केले आमदार मंगेश चव्हाणांचे कौतुक
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे कार्य मोठे असून चाळीसगाव येथे उभारण्यात आलेल्या सुंदर स्मारकामुळे एक प्रेरणादायी वास्तू सर्वाना उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांचे कौतुक केले. मात्र या स्मारकाच्या स्वच्छतेची जबाबदारी सर्व समाजाची असून त्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे वंचित समाजघटकांना न्याय मिळेल असेही त्यांनी सांगितले.

महापुरूषांचे विचार आत्मसात करावे : मंत्री गिरीश महाजन
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, महापुरुषांचे केवळ स्मारक उभारून, जयंती साजरी करून चालणार नाही तर त्यांचे विचार आत्मसात करावे. जयंती उत्सव धांगडधिंगा करून नाही तर विचारांची देवाण-घेवाण करून साजरे करावे, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे मात्र त्यातून देशाला जर महाशक्ती बनवायचे असेल तर तरुणांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहावे त्यासाठी अश्या स्मारकांच्या माध्यमातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.

मंत्री महाजनांकडून दोन कोटी देण्याची घोषणा
गिरीश महाजन यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करणार्‍या या महापुरुषांच्या स्मारकासाठी एक कोटी ऐवजी दोन कोटी निधी देण्याचे जाहीर केले व त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी युद्धपातळीवर याचा पाठपुरावा करून अवघ्या 48 तासांच्या आत निधी मंजुरीचा शासन निर्णय देखील प्रकाशित करून आणला. जागेच्या अडचणी, निवडणूक आचारसंहिता आदी व्यत्यय पार करत अवघ्या 10 महिन्यांच्या चाळीसगाव शहरातील अंधशाळा चौकात या स्मारकाचे काम पूर्ण करण्यात आले.

48 तासात मिळवली मंजुरी
आमदार मंगेश चव्हाण यांनी यासाठी रात्रंदिवस पाठपुरावा करून 48 तासात मंजुरी मिळवली, स्मारकाच्या कामाचे कौतुक करताना हेवा वाटावा अस काम करणारा धडपड्या लोकप्रतिनिधी चाळीसगावला मिळाला आहे, मी देखील जेव्हाजेव्हा चाळीसगाव ला येतो तेव्हा काहीतरी नवीन शिकून जातो असे कौतुकाचे उद्गार त्यांनी काढले.
यावेळी उद्धवराव महाजन, डॉ.संजय माळी, सचिन महाजन यांनी मनोगत व्यक्त केली तर प्रास्ताविक दिनेश महाजन यांनी केले.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले पुणे येथील विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, शेकडो वर्षांची शिक्षण परंपरा असणार्‍या व जगाला शून्याच्या ठेवा देणार्‍या चाळीसगाव मध्ये स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभे राहत आहे ही अभिमानाची बाब आहे. गेल्या 50 वर्षांपासून मागणी असताना देखील कुणीही ती पूर्ण करत नाही यामुळे व्यथित झालेल्या माळी समाजबांधवांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जो स्मारक उभे करेल त्याच्या पाठीमागे उभे राहू अशी भूमिका घेत मोठा मेळावा घेतला होता, त्या कार्यक्रमाला मलाही बोलाविण्यात आले पण मी सांगितले कि आमदार मंगेश चव्हाण आपली मागणी नक्की पूर्ण करतील व आज मी या स्मारकाच्या लोकार्पणाला आलो याचा आनंद आहे.

जाती-पातीच्या पलीकडे जाऊन काम करणारा कार्यकर्ता : आमदार चव्हाण
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून स्मारक उभारणीचा घटनाक्रम सांगितला. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन काम करणारा मी कार्यकर्ता असून चाळीसगाव शहरात विविध महापुरुषांचे स्मारक व चौक उभारणी करत असताना काही मंडळींनी फुले स्मारकाच्या मागणीच्या आडून समाजात विष पसरवण्याचे काम केले मात्र समाजाने देखील कुणाच्या भूलथापाना बळी न पडता मंगेश दादाच हे काम करू शकतात असा विश्वास व्यक्त केला व आज सर्वांच्या प्रयत्नांनी हे भव्य स्मारक पूर्ण झाले, द्वेषाचे विष पसरवण्या एवजी प्रेरणेची फुले उधळली गेली. ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्यांचे स्मारक उभारण्याचे सौभाग्य मला मिळाले यासाठी मी स्वतः ला नशीबवान समजतो. त्यासाठी नामदार गिरीशभाऊ महाजन यांची मदत मिळाली नसती तर कदाचित यासाठी अजून काही वर्ष लागू शकले असते मात्र केवळ स्मारक बांधून थांबायचे नाही तर फुले दांपत्याने जी शिक्षण वाट दाखवली त्यावर चालताना माझ्या स्वतःच्या हिंगोणे गावात ज्या जिल्हा परिषद शाळेत मी शिकलो तिला क्लस्टर मॉडेल स्कूल उभारून त्याला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर केले.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !