शनीपेठ पोलिसांची कारवाई : भुसावळातील ईराणी मोहल्ल्यातील दुचाकी चोरटा जाळ्यात

शनीपेठ पोलिसांच्या एकाच दिवशी तीन धडाकेबाज कारवाईचे कौतुक


Shanipeth Police action: Two-wheeler thief caught in Irani Mohalla, Bhusawal जळगाव (24 ऑगस्ट 2025) : भुसावळातील ईराणी मोहल्ल्यातील दुचाकी चोरट्याच्या जळगावातील शनीपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हसन अली उर्फ आशु नियाजअली इराणी (23, पापा नगर, ईराणी मोहल्ला, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नावे आहे. दरम्यान, दुसर्‍या कारवाईत हद्दपार आरोपीला अटक करण्यात आली असून भुसावळातून चोरलेली एक बेवारस दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

भुसावळातील चोरटा जाळ्यात
शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीतून दुचाकी चोरीला गेली होती व ही दुचाकी भुसावळातील चोरट्याने चोरी केल्याची माहिती शनीपेठ पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. दुचाकी चोरी प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने भुसावळच्या इराणी मोहल्ल्यातून आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पथकातील हवालदार प्रदीप नन्नवरे, हवालदार शशिकांत पाटील, अंमलदार निलेश घुगे, रवींद्र तायडे, पराग दुसाणे, अमोल वंजारी, गणेश ढाकणे यांच्यासह भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील हवालदार रवी नेरकर, अंमलदार प्रशांत सोनार, सचिन चौधरी यांच्या पथकाने केली.




हद्दपार आरोपी जाळ्यात
हद्दपार असतानाही शहरात आलेल्या सागर ऊर्फ झंपर्‍या आनंदा सपकाळे यास शनीपेठ पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार अमोल वंजारी, पराग दुसाणे, निलेश घुगे, काजोल सोनवणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

भुसावळातून चोरी गेलेले वाहन जप्त
विशेष म्हणजे भुसावळातून हिरोहोंडा स्प्लेंडर (एम.एच.19 बी.एस.6662) चोरीला गेल्यानंतर शोध सुरू असताना हे वाहन शनिपेठ हद्दीत बेवारस अवस्थेत मिळाल्याने वाहन मालकाचा परिवहन विभाग आणि बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मदतीने शोध घेण्यात आला व हे चोरी गेलली दुचाकी मूळ मालकास परत देण्यात आली. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील हवालदार रवी नेरकर व प्रशांत देशमुख यांनी ही कारवाई केली.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !