जामनेरात पोलिसाने गुंड पाठवून दिली शिक्षकाला धमकी : 15 तासांच्या आंदोलनानंतर पोलिसाविरोधात गुन्हा


Police sent goons to threaten teacher in Jamner : Case filed against police after 15 hours of protest जामनेर (25 ऑगस्ट 2025) : जामनेरातील एका पोलिसाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे व या कारवाईने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षक कुटुंबाने जामनेर पोलिस ठाण्यात 15 तास ठाण मांडून कैफियत मांडल्यानंतर पोलिस प्रशासनाने दखल घेत गुन्हा दाखल केला.

असे आहे नेमके प्रकरण ?
जळगाव रोडवरील ओमशांती नगरमध्ये लताबाई ठाकरे या सहकुटुंब राहतात. त्यांचा मुलगा गोविंद ठाकरे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्याच मागील कॉलनीत जामनेर पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांचे घर आहे. पाटील दररोज रात्री आमच्या घरासमोर 100 मीटर अंतरात फेर्‍या मातात व महिलांकडे अश्लील नजरेने पाहतात. याच कारणावरून महिन्याभरापूर्वीही आमच्यात वाद झाले होते. त्यावेळी जामनेर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक मधुकर कासार यांच्या मध्यस्थीने वाद मिटले मात्र त्यानंतरही पाटील हे आमच्याच गल्लीत फिरतात. याबाबत त्यांना विचारणा केली असता पाटील यांनी अश्लील शिवीगाळ करून गावगुंड बोलून मुलगा गोविंद ठाकरे यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत लताबाई ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.




पंधरा तास ठिय्या आंदोलन
शनिवारी रात्री साडेदहाला चंद्रकांत पाटील व ठाकरे कुटुंबीयांमध्ये वाद झाले. यानंतर गोविंद ठाकरे हे वृद्ध आई लताबाईसह पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले. पोलिसांनी जबाब लिहून घेतला मात्र रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत तक्रार दाखल करून घेतली नाही त्यामुळे त्यांनी 15 तास पोलिस ठाण्यात ठिय्या दिला.

महिला आयोगाकडे तक्रार
चंद्रकांत पाटील पोलिस असल्याने तक्रार दाखल करून घेतली जात नाही, अशी तक्रार ठाकरे यांचे पोलिस उपनिरीक्षक असलेले बंधू वसंत ठाकरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्याकडे केली. 15 तासांनी पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आपल्याविरोधात खोटी तक्रार : चंद्रकांत पाटील
गोविंद ठाकरे व त्यांचे भाऊ हे नेहमीच फोनवरून धमक्या देतात. ते माझ्याविरुद्ध खोटी तक्रार करू शकतात, असा अर्ज पोलिस निरीक्षकांकडे महिनाभरापूर्वीच केला होता मात्र नातेवाईक असल्याने हे प्रकरण वाढवले नाही. कुठलेही गावगुंड पाठवून धमकी दिलेली नाही. माझ्याविरुद्ध खोटी तक्रार केल्याचे पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !