फिट आल्याचा केला बनाव अन् पाचोर्यात मुख्याध्यापकाचे दोन लाख लांबवले

They pretended to be fit and delayed the principal’s two lakhs in Pachora पाचोरा (26 ऑगस्ट 2025) : बांधकाम मजुरांना देण्यासाठी मुख्याध्यापकाने दोन लाखांची रोकड जेडीसीसी बँकेतून काढली मात्र चोरट्यांनी पाळत ठेवून दुचाकीच्या डिक्कीतून ही रोकड लांबवल्याची घटना पाचोर्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली असून एका अल्पवयीन मुलासह एकूण तीन चोरटे यात कैद झाले आहेत. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले पाचोरा शहरात
पाचोरा शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी सोमवार, 25 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता शहरातील जे.डी.सी.सी. बँकेतून देन2 लाख रुपये काढले. त्यांना ही रक्कम शाळेच्या कामासाठी आणि काही बांधकाम मजुरांना द्यायची होती. त्यांनी काढलेली ही रक्कम सेवावृत्त शिक्षक शेख खलिल शेख नुरा यांच्याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिली. शेख नुरा यांनी ही रक्कम त्यांच्या मोपेडच्या डिक्कीत ठेवली आणि घराकडे निघाले मात्र त्यांना हे माहित नव्हते की बँकेतूनच एक चोरटा त्यांच्यावर पाळत ठेवून होता.
फिट आल्याचा केला बनाव
घरी पोहोचल्यावर शेख नुरा यांनी मोपेड घराच्या कंपाऊंडमध्ये लावली. त्याचवेळी, रस्त्यावर एका लहान मुलाने ‘फिट’ आल्याचा बनाव केला. त्याला मदत करण्यासाठी शेख नुरा धावले. याच संधीचा फायदा घेत, मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना घरातून पाणी आणण्यास सांगितले. शेख नुरा पाणी आणायला घरात गेले आणि चोरट्यांनी मोपेडच्या डिक्कीतील रोकड लंपास केली. या तिघांनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. शेख नुरा यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.