हजारो कार्यकर्त्यांसह मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने

जरांगे उवाच : एकनाथ शिंदे खरा माणूस, त्यांना गरिबांची व्यथा समजते, अजित पवारही चांगले नेतृत्व


Manoj Jarange with thousands of workers towards Mumbai जालना (27 ऑगस्ट 2025) : आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे भव्य मोर्चाला सुरूवात झाली असून मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा पुढे ढकलावा म्हणून मंगळवारी आपले विशेष कार्यकारी अधिकारी मनोज जरांगे यांच्याकडे पाठवले होते.

आंदोलकांच्या निर्णयाकडे लक्ष
मुंबईत सण काळात आंदोलन होऊ नये, यासाठी समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मनोज जरांगे यांनी मोर्चा 27 ऑगस्ट रोजीच निघणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला होता. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यामुळे पुढील टप्प्यात आंदोलकांनी कुठे ठाण मांडायचे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




शिंदे-पवार चांगले नेतृत्व :  मनोज जरांगे
एकनाथ शिंदे खरा माणूस आहे. त्यांना गरिबांची व्यथा समजते. अजित पवारही चांगले नेतृत्व आहेत त्यांच्याकडे गेले की ते गोर गरिगांची कामे करुण देतात. भाजपमधील अनेक मंत्री चांगले काम करतात ,असे मनोज जरांगे यांनी अप्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

सरकारने मनोज जरांगे यांच्या सोबत चर्चा करावी : नाना पटोले
सरकारने जरांगे सोबत चर्चा करावी.. लोकांना आंदोलनाची झळ बसणार नाही याची काळजी सरकारने घ्यायची असते. आज गणेश चतुर्थी आहे. गणपतीचे विचार सरकारने आत्मसात केले असते तर आज आंदोलनाची गरज पडली नसती, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !