50 हजारांची लाच घेताना मालेगावात खाजगी बाऊन्सर जाळ्यात

Private bouncer caught in Malegaon while taking bribe of Rs 50,000 मालेगाव (27 ऑगस्ट 2025) : प्रलंबित वीज बिलाचे काम करून देण्यासाठी 50 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना मालेगावातील खाजगी बाऊन्सर शेख सुल्तान शेख अक्रम (28, नेमणूक मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड, मालेगाव, रा.घर न 223, आयेशानगर, मालेगाव) यास नाशिक एसीबीने अटक केली.
असे लाच प्रकरण
37 वर्षीय तक्रारदार यांना त्यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक 260, प्लॉट क्रमांक 22, मालेगाव येथे बांधलेल्या पत्र्याच्या गोदामात नवीन व्यावसायीक मीटर हवे होते. यासाठी त्यांनी वीज कंपनीत ऑनलाईन अर्ज करीत कोटेशन भरले. तक्रारदाराला सर्वे क्रमांक 260, प्लॉट क्रमांक 31, शॉप क्रमांक देविका मल्ला, बाबा टॉवर, मालेगाव
यावरील प्रलंबित वीज चोरीचे बिल एक लाख 26 हजार 325 रुपये तसेच कंम्पाउंड बिल 40 हजार रुपये भरल्याशिवाय नवीन मीटर कनेक्शन मिळणार नाही, असे मालेगाव पावर सप्लाय लिमिटेड, मालेगाव यांचे कार्यालयातून सांगण्यात आले.
आरोपी तथा खाजगी बाऊन्सर शेख सुल्तान शेख अक्रम यांनी सर्वे नं.260, प्लॉट नं.31, शॉप नं.2 देविका मल्ला, बाबा टॉवर, मालेगाव हा प्लॉट तक्रारदार किंवा त्यांच्या कुटुंबीयां पैकी कोणाच्याही नावावर नसताना त्यावरील प्रलंबित बिल न भरण्याच्या बदल्यात काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे 80 हजार रुपये मागितले व तडजोडीअंती 50 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर 25 रोजी सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली
यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा सुशीला रंगनाथ हांडोरे, पोलिस हवालदार प्रफुल्ल माळी, पोलिस नाईक विलास निकम चालक,
पोलिस कॉन्स्टेबल परशुराम गायकवाड आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.