पारोळ्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त : 40 लाखांचा साठा जप्त


Fake country liquor factory demolished in Parola : Stock worth Rs 40 lakhs seized पारोळा (27 ऑगस्ट 2025) : पारोळा पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे देशी दारूचा बनावट कारखाना उद्ध्वस्त करीत सुमारे 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पारोळा तालुक्यातील बहादरपूर शिवारात, बोरी नदीच्या काठावर ही कारवाई करण्यात आली तीन आरोपींना अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीद्वारे कारवाई
पारोळरा पोलिस निरीक्षक सचिन सानप बनावट दारूच्या कारखान्याबाबत माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी बहादरपूर शिवारात, बोरी नदीच्या काठावर छापेमारी करीत ‘टँगो पंच’ या नावाने बनावट देशी दारूची निर्मिती व पॅकिंग सुरू असताना कारवाई केली. या प्रकरणी राकेश जैन, टिंन्या डोंगर्‍या पावरा आणि कतार सिंग पावरा या तिघांना अटक करण्यात आली.




40 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी यावेळी बनावट कारखान्यातून 3100 नग दारूच्या बाटल्या, आठशे लीटर कच्चा माल, दोन लाख रुपये किंमतीच्या दोन चारचाकी तसेच बाटली पॅकिंग आणि सीलिंगसाठी लागणारी हाय-टेक मशिनरी,
हजारो रिकाम्या बाटल्या, बूच आणि पॅकेजिंग साहित्य आदी मिळून 40 लाख 33 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
पारोळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आणि अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने सुरू असलेला हा अवैध कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नजरेतून कसा सुटला ? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत असले तरी, संबंधित विभागांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !