भुसावळ तहसीलदार निता लबडे अॅक्शन मोडवर : तहसीलमध्ये येणार्या प्रत्येक नागरिकाचे तत्काळ व्हावे काम

Bhusawal Tehsildar Nita Labde on action mode : Every citizen coming to the tehsil should be given immediate work भुसावळ (29 ऑगस्ट 2025) : भुसावळ तहसील कार्यालयात येणार्या प्रत्येक व्यक्तीच्या कामाला प्राधान्य द्यावे, कागदपत्रे पूर्ण घ्यावी, कामांसाठी नागरिकांची फिरवाफिरव व्हायला नको, नागरिकांच्या कामांना महत्व द्यावे, अश्या सूचना तहसीलदार निता लबडे (Bhusawal Tehsildar Nita Labde) यांनी कर्मचार्यांच्या बैठकीत दिल्यात.
तहसीलदारांनी घेतली बैठक
भुसावळ तहसील कार्यालयात गुरूवारी सकाळी तहसीलदार लबडे यांनी कर्मचार्यांची बैठक घेतली. त्यांच्या कामांचा आढावा घेतला. प्रत्येक कर्मचार्यांकडे असलेले कामांची जबाबदारीत काय कामे झाले, काय पेंडीग राहीले याचा आढावा घेण्यात आला.
यात त्यांनी नागरिक काम घेऊन तहसील कार्यालयात येतात त्यांच्या कामाला प्राधान्य द्यावे, जेही काम असेल त्या कामासाठी लागणारे कागदपत्रे हे पूर्ण घ्यावेत, आणि कामे पूर्ण करून द्यावी, एका-एका कामासाठी नागरिकांना तहसील कार्यालयाच्या चक्करा मारायला लावू नका, अश्या सूचना केल्यात, यावेळी निवासी नायब तहसीलदार शोभा घुले यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.