मोबाईलचे व्यसन सोडा, मैदान गाजवा : मंत्री संजय सावकारे
भुसावळात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मैदानी स्पर्धेचे थाटात उद्घाटन
Quit mobile phone addiction, dominate the field: Minister Sanjay Savkare भुसावळ (29 ऑगस्ट 2025) : विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून लांब राहून मैदानी खेळ खेळायला हवेत. आपला राष्ट्रीय खेळ हॉकी असून या खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला उच्च पदावर ती जाता येते. हे मेजर ध्यानचंद, महेंद्रसिंग धोनी अशा विविध खेळांनी दाखवून दिले आहे. खेळाला करियर म्हणून निवडा व खेळा, असे आवाहन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे केले.
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त क्रीडा व युक सेवा संचनालयन महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग व क्रीडा विभाग भुसावळ. यांच्याद्वारे बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मंत्री सावकारे बोलत होते.





यांची होती उपस्थिती
प्रसंगी बियाणी मिलिटरी स्कुलचे संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, तालुका क्रीडा अधिकारी मीनल थोरात, शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे, क्रीडा भारतीचे बी.एन.पाटील, राजेंद्र कुलकर्णी, तालुका अॅथलेटिक्स असोसिएशनचे रवी चोपडे, निकम,. यांच्यासह सर्व खेळाडू प्रशिक्षक पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असा आहे स्पर्धेचा निकाल
17 वर्षाखालील मुली धावणे (शंभर मीटर) ः प्रथम- शरण्या मनिष भंडारी, द्वितीयल् वैष्णवी कृष्णा लोहार, तृतीय- अनन्या मनोज काळे
शंभर मीटर धावणे, मुले- प्रथम- कुवरजित निकम प्रथम, द्वितीय- योहान फोर्सिलीनो, तृतीय- परवेज तडवी,
200 मीटर धावणे मुली- प्रथम- अनन्या काळे, द्वितीय-आरती बारेला- तृतीय- अनोत्तरा गुरचळ
दोनशे मीटर धावणे मुले- प्रथम- प्रसाद सोनवणे, द्वितीय- पार्थ खाचणे, तृतीय मनीष ननवरे
400 मीटर धावणे मुली- प्रथम सिंड्रेला बॉबी पवार, द्वितीय प्रेरणा डांगे, तृतीय- टीना बोंडे
400 मीटर धावणे मुले- प्रथम- कृष्णा राठोड, द्वितीय- प्रसाद सोनवणे, तृतीय- पार्थ खाचणे, 1500 मीटर धावणे मुली इशिका गाडे प्रथम पुरुषमी सोनवणे द्वितीय, तृतीय सिंड्रेला पवार
पंधराशे मीटर धावणे- मुले- योगेश कोळेकर (प्रथम), ऋषिकेश बानाईत (द्वितीय), धर्मपाल सम्यक (तृतीय)
चार बाय शंभर रिले- मुलींमध्ये सिंड्रेला बॉबी पवार, इशा घोडके, वैष्णवी लोहार, अनन्या काळे, प्रथम तर मुलांमध्ये कुणाल पाटील, कुवरजीत निकम, सोहम बेंडाळे, नैतीक चौधरी प्रथम
खुल्या गटामध्ये शंभर मीटर धावणे महिला- प्रथम- प्रतिज्ञा मनोरे, मुलांमध्ये कियार बारेला प्रथम, द्वितीय- कृष्णा राठोड, तृतीय- रितिक जाधव
200 मीटर धावणे पुरुष- प्रथम- कियार बारेला, द्वितीय- यश शिरसाळे, तृतीय- परेश चौधरी
1500 मीटर पुरुष, प्रथम- आदित्य जाधव, द्वितीय किरण पाटील, तृतीय- रितीक जाधव
चार बाय शंभर रिले पुरुष- यश पगारे, प्यार सिंगारेला, पैसा कृष्णा राठोड (प्रथम), करण कोळी, प्रेम भटकर, सौरभ चौधरी, लोकेश कोळी (द्वितीय)
पंच म्हणून विलास पाटील, हिंमत पाटील, चंद्रकांत निकम, रवींद्र चोपडे, राहुल महाजन, गोपीसिंह राजपूत, डॅनियल पवार, ममता जांगीड, किरण पाटील, गुड्डूकुमार गुप्ता, पुर्वेश सोनवणे, हिरालाल गौड़,
इरफान शेख, गौरी लोहार, सुजल शुक्ला, सुरंन्द्र पाटील, चव्हाण, दत्तू अहिरे आदींनी काम पाहिले.
आभार विलास पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे भुसावळ तालुका पदाधिकार्यांचे योगदान लाभले.
