गरोदर प्रेयसीचा लग्नासाठी हट्ट ; प्रियकराने केले असे की सारेच हादरले
Pregnant girlfriend insists on marriage ; boyfriend’s move shocks everyone आंबा (31 ऑगस्ट 2025) : गरोदर प्रेयसीने लग्नाचा हट्ट धरल्याने प्रियकराने दोन सहकार्यांच्या मदतीने प्रेयसीचा खून केला व मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकला.
तरुणी बेपत्ता असल्याची दाखल होती तक्रार
21 ऑगस्ट रोजी मिरजोळे येथील हेमंत जितेंद्र मयेकर यांनी बहिण बेपत्ता असल्याची फिर्याद रत्नागिरी शहर पोलिसात दिली. याप्रकरणी खंडाळा येथील बार व्यावसायिक दुर्वास दर्शन पाटील (30) यास पोलिसांनी ताब्यात घेताच त्याने खून केल्याचे कबूल केले.





सहकारी आरोपींना घेऊन रत्नागिरी व देवरूख पोलिसांचे पथक घाटात दाखल झाले. आंब्यातील अपघात मदत पथकातील पंधरा तरुणांना पोलिसांनी पाचारण करून दरीतील मृतदेहाचा शोध घेतला व पथकाने दरीत उतरण्यास वाट तयार करून घेतली.
तीन तासानंतर उपविभागीय पोलिस अधीक्षक निलेश माईनकर, ववेक पाटील, मुख्य आरोपीस घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तीन दोरखंड गाडीच्या चालकाला बांधून त्याच्या सहाय्याने सहा तरूण घसरच दरीत उतरले. 20 मिनिटात मृतदेह प्लास्टिकमध्ये बंदिस्त करून रस्त्यावर आणला गेला. दरीत खाली साठ फूट खोल झाडीत मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला.
फिर्यादी व आरोपी व साक्षीदार यांच्या समक्ष मृतदेहाची ओळख पटवली. अंगावरील गुलाबी नक्षीकाम ड्रेस व हातावरील टॅटू वरून भाऊ हेमंत याने बहिणीची ओळख पटवली.
बारा दिवसांपूर्वीचा मृतदेह असल्याने चेहरा सडून कवटी शिल्लक राहिली. सतत पाऊस असल्याने दुर्गंधी पसरलेली नव्हती.
भक्ती व दुर्वास यांचे दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. गरोदर राहिल्याने तिने लग्नाचा हट्ट धरला पण त्याने विरोध केला. प्रेयसी ऐकत नाही हे पाहता आपल्या जिवनातील अडथळा दूर करण्यासाठी तिचा खून करून तिचा मृतदेह रत्नागिरी पासून सत्तर किलोमीटरवरील गायमुख जवळील दरीत फेकून दिला. तिच्या खूनानंतर दोन दिवसांत त्याने दुसर्या मुलीशी साखरपुडा केल्याची संतापजनक बाब मयेकर कुटूबियांकडून समजली.
