शेतात निंदणीचे काम करतांना महिलेचा सर्पदंशाने मृत्यू
बोरमाळ तांड्यातील घटना : दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ
Woman dies of snakebite while weeding in field सोयगाव (31 ऑगस्ट 2025) : शेतात निंदणीचे काम करतांना अचानक पिकांमध्ये असलेल्या नाग प्रजातीच्या सापाने दंश केल्याने महिला शेतकर्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. ही घटना तिडका शिवारात रविवारी सायंकाळी सहा वाजता गट क्र.111 मध्ये घडली. रुखमाबाई शिवा जाधव (60, बोरमाळ तांडा) असे सर्पदंशाने मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
रुखमाबाई या महिला गट क्र.111 मध्ये शेतात पिकांच्या निंदणीचे काम करत असताना अचानक दगडाखाली असलेल्या नाग प्रजातीच्या सापाने तिला पायावर दंश केला असता ती बेशुद्ध पडली. तिला तातडीने बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला पाचोरा येथे हलविण्यात आले परंतु तिला वैद्यकीय सूत्रांनी तपासून मृत घोषित केले.





