राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकलिंग स्पर्धेचे थाटात उद्घाटन
विद्यार्थी व खेळाडूं यांनी नियमित सायकल चा वापर करावा : योगेश बाफना
Cycling competition inaugurated with pomp on the occasion of National Sports Day भुसावळ (1 सप्टेंबर 2025) : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचा आणि जागतिक व्यासपीठांवर देशाला अभिमान वाटणार्या आपल्या खेळाडूंच्या कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आहे. सन 2025 या वर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन हा ऑलिंपिक भावना आणि उत्कृष्टता, मैत्री आणि आदर या मूलभूत मूल्यांना भारताची आदरांजली म्हणून साजरा केला जात आहे. त्यासाठी क्रीडा व युक सेवा संचनालयन महाराष्ट्र राज्य पुणे, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन व जिल्हा सायकलिंग असोसिएशन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, यांच्याद्वारे बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
उद्घाटन योगेश बाफणा यांच्याहस्ते झाले. बियाणी मिलिटरी स्कुलचे संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे सचिव डॉ.प्रदीप साखरे, डॅनियल पवार, दत्तु अहिरे यांच्यासह सर्व खेळाडू प्रशिक्षक पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.





मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे उद्घाटक योगेश बाफना म्हणाले की, खेळाडूंनी मोटरसायकल बाईक ऐवजी सतत सायकलचा वापर केला पाहिजे. सायकल चालवणे हा सर्वात उत्तम व्यायाम आहे व सर्वांना स्पर्धेसाठी विजयासाठी व राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पंच म्हणून विलास पाटील, हिंमत पाटील, दत्तू अहिरे, डॅनियल पवार यांनी काम पाहिले. आभार प्रदीप साखरे यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे भुसावळ तालुका पदाधिकारी यांचे, जिल्हा सायकलींग असोसिएशन चे योगदान लाभले.
