एचडीएफसी बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये आढळल्या बनावट नोटा

Fake notes found in HDFC Bank cash deposit machine बीड (1 सप्टेंबर 2025) : राज्यभरात बनावट नोटांचा धुमाकूळ सुरू असताना बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एचडीएफसी बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये (सीडीएम) 500 रुपयांच्या सातब नावट नोटा टाकणार्या तरुणाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण ?
बीड शहरातील बाजीराव कॉम्प्लेक्स येथेएचडीएफसी बँकेची शाखा आहे. 30 ऑगस्ट रोजी बँकेचे रोखपाल नकुल घुंगरडव कर्मचारी विकास बोरवडे हे तपासणीसाठी गेले होते. मशीनचा पैसे जमा होणारा यूआरजेबी बॉक्स उघडल्यानंतर त्यांना पाचशे रुपयांच्या सात बनावट नोटा आढळल्या. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एक व्यक्ती त्यांना बनावट नोटा टाकताना दिसून आला. या व्यक्तीच्या बँक खात्याची माहिती काढल्यानंतर त्याचे नाव वैभव आगाम (रा. पिंपरगव्हाण, ता.बीड) असल्याचे समोर आले. या प्रकरणीनकुल घुंगरड यांच्या तक्रारीवरून वैभवआगाम विरोधात गुन्हा नोंद झाला..
वर्षभरात तिसरा प्रकार उघड
वर्षभरापूर्वी बीड शहरात आठवले गँगचे सदस्य नोटा छापत असल्याचा प्रकार समो रआला होता. त्यात मनीष क्षीरसागर हा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले होते.त्यानंतर गेवराईत सहा महिन्यांपूर्वी 20हजारांच्या बनावट नोटा चलनात आणताना संशयिताला पेट्रोल पंपावर पकडण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा बनावट नोटाबँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरल्याचाप्रकार उघड झाला. त्यामुळे बीडमध्ये बनावटनोटांचे सिंडीकेट असावे, असा संशय आहे.