राज्य सरकार असंवेदनशील ; शब्द दिल्याप्रमाणे आरक्षण द्यावे ; सुप्रिया सुळे


State government insensitive; Reservation should be given as promised; Supriya Sule बारामती (1 सप्टेंबर 2025) : मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते असताना आरक्षण देतो असं सांगितलं होतं. आता त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाला बोलवावं आणि यातून योग्य तो मार्ग निघेल असेही सुळे म्हणाल्या. देशात 250 खासदार कोणाचे आहेत? मग सगळ्या बातम्या शरद पवारांच्या आजूबाजूलाच फिरतात. पवार साहेबांकडून लोकांच्या अपेक्षा आहेत, असेही सुळे म्हणाल्या.






घटना दुरुस्ती करुन आरक्षण द्या, तुमच्याकडे बहुमत आहे. सत्ता ज्याच्याकडे आहे तो आरक्षण देऊ शकतो ना? असेही सुळे म्हणाल्या. त्यांनी प्रस्ताव आणावा आम्ही ताकदीने त्यांच्या सोबत उभे राहू, असेही सुळे म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच विरोधी पक्ष काळातील व्हिडिओ क्लिप सुप्रिया सुळे यांनी दाखवली. देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं होतं ते करुन दाखवावं, असंही सुळे म्हणाल्या.

देअर इज विल देअर इज अ वे, असे फडणवीस म्हणाले होते. सत्ता फक्त घर फोडण्यासाठी आणि पक्ष फोडण्यासाठी नसते तर ही सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी असते असेही सुळे म्हणाल्या. आमचं घर फोडलं आमचा पक्ष फुटला आणि एवढं करूनही व्हिडिओ आमचाच बनवला असे सुळे म्हणाल्या. मंडल आयोगाचा रिपोर्ट सविस्तर वाचा. याबाबत संसदेत अनेकदा बोलली आहे. आमचं सरकार असतं तर आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊ शकलो असतो असेही सुळे म्हणाल्या.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !