शासनाची दिशाभूल करीत लाटले अन्न सुरक्षा योजनेतून धान्य : पिंपळगावातील नऊ लाभार्थींविरोधात गुन्हा
Misleading the government by diverting food grains from the food security scheme: Case filed against nine beneficiaries in Pimpalgaon पाचोरा (2 सप्टेंबर 2025) : शासनाने ठरवून दिलेल्या निकषात पात्र नसतानाही दिशाभूल करीत अन्न सुरक्षा योजनेतून रेशनचे मोफत धान्य लाटणार्या पिंपळगाव हरेश्वर येथील लाभार्थीविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
सामाजिक कार्यकर्ते नीलेश नामदेव उभाळे (रा.भोजे) यांनी दोन वर्षापूर्वी दिलेल्या तक्रारीनुसार प्रांताधिकारी पाचोरा यांच्या आदेशान्वये पाचोरा पुरवठा निरीक्षक सुषमा उरकुडे यांनी चौकशी अंती पिंपळगाव हरेश्वरच्या लाभार्थीविरोधात फिर्याद दाखल केली. गुन्ह्यास पात्र असल्याने नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील शुभांगी व कविता यांचा विवाह झाल्यानंतर देखील मोफत धान्य घेऊन शासनाची फसवणूक करण्यात आली.





यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
शंकर माधव क्षीरसागर, मुक्ताबाई शंकर क्षीरसागर, अमोल शंकर क्षीरसागर, पंडित धनु माळी, कविता शंकर क्षीरसागर तसेच प्रदीप माधव क्षीरसागर, मनीषा प्रदीप क्षीरसागर, भूषण प्रदीप क्षीरसागर, शुभांगी प्रदीप क्षीरसागर यांनी पात्र नसताना शासनाकडून मोफत धान्याचा लाभ घेतल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
