पोलिस ठाण्यात का आला? गाडीतून खाली उतर म्हणत जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला


Why did you come to the police station? A young man was attacked with a sharp weapon in Jalgaon, asking him to get out of the car जळगाव (3 सप्टेंबर 2025) : जळगावातील एमआयडीसी परिसरातील बालाजी इंडस्ट्रीजवळ एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले तरुणासोबत ?
जळगाव तालुक्यातील रायपूर येथील राजकिरण मानसिंग परदेशी (26) हे 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी कामावर जात असताना, एमआयडीसीतील बालाजी इंडस्ट्रीजवळ त्यांना दोन जणांनी अडवले. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना ‘तू भाई झाला का? पोलीस स्टेशनला का आला होतास? गाडीतून खाली उतर,’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.






यानंतर त्या दोघांनी मिळून राजकिरण यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एकाने आपल्याजवळील धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत राजकिरण यांनी उपचार घेतल्यानंतर एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या तक्रारीनुसार, कृष्णा शिंदे आणि मयूर नामक तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास हवालदार संजीव मोरे करीत आहेत.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !