धुळे गुन्हे शाखेची कारवाई : तडीपार आरोपीला अटक
Dhule Crime Branch action : Abroad accused arrested धुळे (3 सप्टेंबर 2025) : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे सहा महिन्यांसाठी हद्दपार केल्यानंतरही संशयीताचा शहरात वावर असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळताच संशयीताच्या मुसक्या आवळण्यात आल्या. चेतन जिभाऊ पाटील (30, भोकर, ता.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
संशयीत चेतन पाटील यास गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते मात्र संशयीत धुळ्यातील गोंदूर रोडवरील सौभाग्य लॉन्स परिसरात फिरत असताना गुन्हे शाखेने त्यास अटक करीत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.





