चिखली बुद्रुक येथे गणेशोत्सवात कीर्तन ठरतय लक्षवेधी
Kirtan is becoming an eye-catcher during Ganeshotsav at Chikhali Budruk यावल (4 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक या विठ्ठल मंदिर भजनी मंडळ यांच्याकडून गणेश उत्सवात प्रबोधनात्मक भजनी सादर केली जात आहे.
दरवर्षी सदर भजनी मंडळ हा उपक्रम घेतात. यंदा सदरली भजन नागरीकांचे लक्ष वेेधत आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष हभप मधुकर महाराज – पाटील सह दिलीप महाराज – पाटील, सुभाष महाराज – कोळी रवींद्र महाराज – कोळी या समस्त सेवेकरांच्या माध्यमातून भजन व कीर्तन सेवा गावाची देण्यात येत आहे.





चिखली बुद्रुक ता.यावल येथे 11 दिवसाचा गणेशोत्सव असतो. या दरम्यान गावात विविध कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात येतात. या गावातील विठ्ठल मंदिर भजनी मंडळ यांच्या वतीने प्रबोधनात्मक भजनं गावात केली जात आहे. दरवर्षी सदरील भजनी मंडळाकडून गावात गणेशोत्सव, दुर्गोत्सव सह विविध मंदिरातील धार्मिक कार्यक्रम या करीता भजन सादर केले जाते तसेच परिसरातील गावात देखील या मंडळाकडून प्रबोधन करण्यात येते. या करीता रमेश काळे, सोमा पाटील,बाळु कोळी, विलास पाटील, कल्पेश पाटील, जिवराम पाटील, गोेकुळ पाटील सह आदी परिश्रम घेत आहे.
