लग्नाच्या आमिषाने शिक्षिकेवर अत्याचार : जि.प.च्या माजी सदस्याविरोधात गुन्हा
Torture of teacher on the pretext of marriage : Crime against former ZP member बीड (5 सप्टेंबर 2025) : राज्यात महिलांसह मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून एका शिक्षिकेवर सातत्याने अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे सदस्य नारायण बलभीम शिंदे यांच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.





पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल 2006 ते डिसेंबर 2022 या कालावधीत नारायण शिंदे यांनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवले तसेच फ्लॅट आणि इतर कामांसाठी तिच्याकडून पैसेही घेतले. नंतर त्यांनी लग्न करण्यास नकार दिला आणि विश्वासघात केला.
पैशांची मागणी पूर्ण न केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप पीडित शिक्षिकेने केला आहे. या गंभीर आरोपांमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
