जळगाव गुन्हे शाखेची अवैध गॅस रिफिलिंगवर मोठी कारवाई : दोन आरोपींसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
Jalgaon Crime Branch takes major action against illegal gas refilling : Two accused and valuables worth five lakhs seizedधरणगाव (5 सप्टेंबर 2025) : अवैधरित्या गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर दोन ठिकाणच्या छापेमारीत पाच लाख 16 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संयुक्त कारवाईने खळबळ
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह पाळधी पोलिसांची बांभोरी येथे एसएसबीटी कॉलेजच्या मागे टाकलेल्या छाप्यात अनिल शंकर सोनवणे (रा. बांभोरी) यास अवैध गॅस भरताना पकडले. आरोपीकडून 50 एचपी कंपनीचे रिकामे सिलेंडर, त्याच कंपनीचे दोन भरलेले सिलेंडर, 8 भारत गॅस कंपनीचे सिलेंडर, वजन काटा, गॅस भरण्याचे मशिन, 1 मारुती सुझुकी कंपनीचे वाहन (क्र. एम एच 19 सी एक्स 1075) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.





दुसर्या कारवाईत महामार्गावर असलेल्या हॉटेल सूर्याच्या बाजूला मोईन शेख युसुफ शेख (रा.तांबापुरा, जळगांव) याच्याकडे भारत गॅस कंपनीचे 2 भरलेले सिलेंडर, त्याच कंपनीचे 6 रिकामे सिलेंडर, वजन काटा, गॅस भरण्याचे मशिन असा माल मिळून आला.
या दोन्ही छाप्यात एकूण पाच लाख 16 हजार रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला. या दोघांवर पाळधी पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सोपान गोरे, सलीम तडवी, छगन तायडे, मयूर निकम, पाळधीचे एपीआय प्रशांत कंडारे, ए.एस.आय. सुनील लोहार, रमेश सुर्यवंशी, अमोल धोबी यांच्या पथकाने केली.
