जय गणेश फाउंडेशनच्या समूह नृत्य स्पर्धेत ‘राधे राधे ग्रुप’ प्रथम
पारितोषिक वितरण : कलाजागरने भुसावळच्या लौकीकात भर पडणार : डीवायएसपी गावित
‘Radhe Radhe Group’ wins first place in Jai Ganesh Foundation’s group dance competition भुसावळ (8 सप्टेंबर 2025) : जय गणेश फाउंडेशनने गणेशोत्सवात जो कलाजागर केला तो भुसावळच्या लौकीकात भर घालणारा आहे. फाउंडेशनने गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीपेक्षा भक्तीची उंची वाढली पाहिजे असा जो संदेश दिला तो जिल्ह्यासाठी आदर्श आहे असे गौरवोद्गार डीवायएसपी संदीप गावित यांनी येथे काढले. गणेशोत्सवात घेतलेल्या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. समूहनृत्य स्पर्धेत ‘राधे राधे ग्रुप’ प्रथम तर गिरीजा आरोही ग्रुप द्वितीय क्रमांकाचा माकरी ठरला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
विचार मंचावर भुसावळ पोलिस निरीक्षक राहुल वाघ, श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र मांडे, जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची उपस्थिती होती.





प्रा.गिरीष कुलकर्णी यांनी जय गणेश फाउंडेशनचे सांस्कृतिक कार्यक्रमातून असंख्य कलावंत घडत असल्याने हे एक आयडॉल आहे. उपक्रमातील सातत्य हे पथदर्शी आहे. स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेंद्र पाटील यानीही मनोगत व्यक्त केले. कलात्मकता, सूत्रबद्धता, नियोजन कसे करावे हे या फाउंडेशनकडून शिकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.
फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर, सचिव तुकाराम आटाळे प्रकाश चौधरी, सुधीर देशपांडे, राजेंद्र चोरडिया, कोषाध्यक्ष राहुल भावसेकर, समन्वयक गणेश फेगडे यांचीही उपस्थिती होती. सूत्रसंचालन हर्षल वानखेडे, साक्षी चौधरी यांनी केले. गणेशोत्सवात सलग दहा दिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची आखणी करून त्यांची अंमलबजावणी करणारे आदर्श मंडळ म्हणजे जय गणेश फाउंडेशन हे होय अशा शब्दांत महेंद्र मांडे यांनी पदाधिकार्यांचे कौतुक केले.
स्पर्धांतील प्रमुख विजेते असे
प्रश्न मंजुषा स्पर्धा : प्रथम हर्ष राठी, द्वितीय प्राची चौधरी, उत्तेजनार्थ रिद्धी पाटील
रंगभरण स्पर्धा : लहान गट : प्रथम केतकी राठोड, द्वितीय ईश्वरी महाजन, उत्तेजनार्थ शर्वरी महाजन. मोठा गट : प्रथम रणवीर जोनवाल, द्वितीय हिमानी कोलते, उत्तेजनार्थ हेतल राठोड
रांगोळी स्पर्धा : प्रथम देवयानी कोलते, द्वितीय हेतल राठोड, उत्तेजनार्थ प्रांजल चौधरी.
सोलो डान्स : लहान गट : प्रथम नुपूर भालेराव, द्वितीय गिरीजा सावदेकर, उत्तेजनार्थ : फलश्री चौधरी. मोठा गट : प्रथम साक्षी कुलकर्णी, द्वितीय लावण्य सनान्से, उत्तेजनार्थ रमनस्वी बारजिभे
ग्रुप डान्स लहान गट : प्रथम राधे राधे ग्रुप, द्वितीय गिरीजा आरोही, उत्तेजनार्थ लिटिल प्रिन्सेस. मोठा गट : प्रथम हिप टॉप, द्वितीय नंदाणे अॅण्ड विद्या
होम मिनिस्टर : प्रथम कल्याणी पंकज अट्रावलकर,द्वितीय क्रमांक माधुरी चौधरी
