भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात शिक्षक दिन
Teachers’ Day at PU Nahata College, Bhusawal भुसावळ (8 सप्टेंबर 2025) : शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात स्टाफ अकॅडेमी व स्टाफ व स्टुडन्ट वेलफेअर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन व शिक्षकांचा गौरव समारंभ झाला.
यांची होती उपस्थिती
संस्थाध्यक्ष डॉ.मोहन फालक अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, खजिनदार संजयकुमार नाहाटा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील, पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर आदी उपस्थित होते.





प्राध्यापकांचा सहृदय सन्मान
प्रमुख वक्त्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकला. त्यात त्यांनी एक शिक्षक ते देशाचे राष्ट्रपती हा प्रवास उद्धृत केला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ.मोहन फालक यांनी आजच्या काळात शिक्षकाचे एक नैतिक मार्गदर्शक म्हणून महत्व विषद केले.
त्यानंतर शै. वर्ष 2024-25 मध्ये वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पी. एच. डी. पदवी, पेटंट, आंतराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशन, नेट सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल सर्वांचे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव-सन्मान करण्यात आला.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
प्रास्ताविक प्रा.डॉ.पी.एच.इंगोले यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे, प्रा.डॉ.मनोज जाधव, प्रा.पूनम महाजन यांनी केले. यशस्वीतेसाठी समिती सदस्य प्रा.डॉ.गौरी पाटील, प्रा.डॉ.एस.टी.धूम, प्रा.डॉ.एस.के.राठोड, प्रा.डॉ.सचिन येवले, प्रा.स्मिता बेंडाळे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
