पाळधीत डाव उधळला : 16 जुगारी कारवाईच्या कचाट्यात
गुन्हे शाखेच्या कारवाईने खळबळ : 12 लाखांचा मुद्देमाल जप्त
Gambling scheme foiled in Paladhi: 16 gamblers in the crosshairs of action जळगाव (8 सप्टेंबर 2025) : जळगाव तालुक्यातील पाळधी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जळगाव गुन्हे शाखेने छापेमारी करीत 16 जुगारींना अटक केली तर रोख रकमेसह जुगार साहित्य मिळून 12 लाख 24 हजार 260 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सात लाख 22 हजार 260 रुपयांची रोकड व पाच लाख दोन हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन यांचा समावेश आहे. एलसीबी पथक आणि पाळधी दुरक्षेत्र अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या या संयुक्त कारवाई प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, हेड कॉन्स्टेबल अक्रम शेख, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, नितीन बाविस्कर, सलीम तडवी, विनोद पाटील, विजय पाटील, रवींद्र चौधरी, कॉन्स्टेबल रवींद्र कापडणे, सिद्धेश्वर डापकर, राहुल रगडे, रतन गीते, मयुर निकम, भारत पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकूर तसेच पाळधी दुरक्षेत्राचे एपीआय प्रशांत कंडारे, कॉन्स्टेबल अमोल धोबी, रवींद्र चौधरी आदींच्या पथकाने केली.
