चोपडा तालुक्यात भीषण अपघात : दोघे भावंडे जागीच ठार

Terrible accident in Chopra taluka : Two siblings killed on the spot चोपडा (9 सप्टेंबर 2025) : भरधाव कारने उडवल्याने दोघा भावंडांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात चोपडा तालुक्यातील वर्डी फाटा ते वडती फाट्याच्या अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्गावर घडला. मगन जगन बारेला (25) व रगन जगन बारेला (18, वर्डी, ता.चोपडा) अशी मृत भावंडांची नावे आहेत.
कसा घडला अपघात
सोमवार, 8 रोजी संध्याकाळी पाच वाजेचा सुमारास अडावद चोपडा दरम्यान वडती फाट्याजवळ अडावदकडून चोपडाकडे जाणार्या चारचाकी (एम.एच.04 एच. एफ. 8296) ने समोरून भरधाव येणार्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील स्वार मगन जगन बारेला (25) व रगन जगन बारेला (18, दोन्ही रा.वर्डी, ता.चोपडा) हे दोन्ही सख्खे भाऊ जागीच ठार झाले.

पोलिसांनी घेतली धाव
अपघातानंतर अडावद पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळ गाठूलन वाहतूक सुरळीत केली. चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील प्रशांत पाटील (मामू) यांनी दोघांना रुग्णवाहिकेत टाकले. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉ. पवन पाटील यांनी दोघांना मृत घोषीत केले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. पवन पाटील यांनी शविच्छेदन केले.
याबाबत चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली व ही नोंद शून्य क्रमांकाने अडावद पोलिसात वर्ग करण्यात आली.
