व्यसनांमुळे शरीरासोबतच समाजाचेही नुकसान ! : भुसावळ शहर निरीक्षक उद्धव डमाळे
के.नारखेडे विद्यालयात निबंध लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात
भुसावळ (10 सप्टेंबर 2025) : व्यसनांमुळे शारीरिक विकारांबरोबरच मानसिक विकारही लागतात आणि सामाजिक नुकसानही होते त्यामुळे कोणत्याही व्यसनांच्या आहारी जाऊ नका तसेच व्यसनाधीन लोकांच्या संगतीत सुद्धा राहू नका, असे आवाहन भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे यांनी येथे केले. शहरातील के.नारखेडे विद्यालयात अंमली पदार्थ सेवन विरोधी जनजागृती मोहिमेच्या अंतर्गत व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. भुसावळ शहर पोलिस स्टेशनतर्फे आयोजित ‘अंमली पदार्थांचे सेवन जीवनाशी खेळ’ या विषयावर घेतलेल्या निबंध लेखन स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे म्हणाले की, अंमली पदार्थांबरोबरच समाज माध्यमांच्या व्यसनांपासूनही दूर रहावे
गुणवंतांचा बक्षीसाने गौरव
निबंध स्पर्धेत आदित्य प्रशांत उघडे (प्रथम), मधुश्री महेश बर्हाटे (द्वितीय) तर पौरवी माधव गरुडे (तृतीय) आली. गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.





व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर के.नारखेडे विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, बी.बी.जोगी, पोलिस हवालदार संदेश निकम उपस्थित होते. आभार पर्यवेक्षक सुनील पाठक यांनी मानले. परीक्षक म्हणून एस.डी.वासकर होते. सूत्रसंचालन एस.पी.महाजन यांनी केले.
