भुसावळात पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय परिषद


One-day National Conference organized by the Department of Computer Science at PU Nahata College, Bhusawal भुसावळ (10 सप्टेंंबर 2025) : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे अकराव्यांदा एक दिवसीय राष्ट्रीय परिषद मंगळवार, 9 रोजी झाली. या परीषदेत सुमारे 50 संशोधक प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात संगणक व माहिती तंत्रज्ञानातील नवीन विचार प्रवाह या विषयावर सखोल असे विवेचन उपस्थित संशोधकांनी केले.

यांची होती उपस्थिती
या परीषदेचे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांनी केले. प्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये ताप्तीचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, प्राचार्य प्रोफेसर डॉ.बी.एच.बर्‍हाटे, वक्ते प्रा.डॉ.प्रियंका व्ही.बर्‍हाटे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.गजेंद्र आर.वाणी, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य वाय.एम.पाटील, पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील, डेटा सायंन्स विभागप्रमुख प्रा.डॉ.गौरी एम. पाटील, एमसीए समन्वयक प्रा.हर्षल व्ही.पाटील, परिषदेच्या सचिव डॉ. स्वाती पी. फालक, परिषद समन्वयक प्रा.पूनम एम.महाजन, परिषद सहसमन्वयक प्रा.मेघा चौधरी यांची उपस्थिती लाभली. ही परीषद एकूण तीन सत्रात झाली.






चुका टाळण्यासाठी दिल्या टीप्स
प्रथम सत्रात प्रा.डॉ.प्रियंका व्ही. बर्‍हाटे यांचे बीजभाषण झाले. बीजभाषणात प्रा.डॉ.प्रियंका बर्‍हाटे यांनी ‘मँगो फ्रूट डिसीज आयडेंटीफिकेशन युजिंग इमेज प्रोसेसिंग अ‍ॅण्ड मशीन लँग्वेज’ या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. संशोधन कसे करावे व होणार्‍या चुका टाळण्यासाठी महत्वाच्या टिप्स प्रा.डॉ.बर्‍हाटे यांनी दिल्या.

परिषदेच्या व्दितीय सत्रामध्ये संशोधकानी शोधनिबंधाचे वाचन केले. यावेळी सेशन चेअर म्हणून प्रा.डॉ.सीमा राणे यांनी शोधनिबंधांचे परीक्षण केले.

परीषदेच्या तिसर्‍या सत्रामध्ये निरोप समारोह झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. गजेंद्र वाणी उपस्थित होते.

सहभागी प्रा.पूनम इंगळे यांनी परिषदेचे आयोजन अतिशय उत्कृष्टपणे करण्यात आले, असे आपल्या अभिप्रायात नमूद केले. सहभागी विद्यार्थिनीने आजची परिषद ही विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधनासाठी मार्गदर्शक व उपयुक्त झाली असा अभिप्राय दिला.

मान्यवरांच्या हस्ते सहभागी संशोधक प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

परिषदेचे संयोजक प्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. गजेंद्र आर. वाणी, प्रा.डॉ.गौरी एम.पाटील, प्रा.हर्षल व्ही.पाटील, आयोजन समिती सचिव डॉ.स्वाती पी.फालक यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा.पूनम एम.महाजन, सहसमन्वयक प्रा.मेघा चौधरी व सर्व संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने परिषद यशस्वीरित्या झाली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !