भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये पदग्रहण समारंभ उत्साहात
The inauguration ceremony at Tapti Public School in Bhusawal was a joyous occasion. भुसावळ (11 सप्टेंबर 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुवार, 11 रोजी विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात झाला.
यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत व भारतीय सैन्यातील सुभेदार मेजर नीरज कुमार शर्मा हे उपस्थित होते. प्रसंगी शाळेच्या प्रिंसीपल नीना कटलर यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन हाऊसच्या प्रमुख गायत्री घिर्णीकर, कल्पना चावला हाऊसच्या मनीषा किरंगे, आर.आर्यभट् हाऊसचे पंकज राठोड व होमो भाभा हाऊसच्या सोनाली शिवरामे यांना तसेच प्रत्येक हाऊसच्या विद्यार्थी प्रमुख,उपप्रमुख यांना पद प्रदान करुण बॅच दिले.
आकस्मिक नेता म्हणून हर्षला पाटील हिची निवड करण्यात आली. शाळेचा हेड बॉय सोहम बेंडाळे, हेड गर्ल सानिका वाणी यांची निवड करण्यात आली.





जीवनात शिस्तीला महत्व
नीना कटलर यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व जीवनात शिस्तीचे महत्व समजावून सांगितले. प्रसंगी पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत व सुभेदार मेजर नीरज कुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सोफिया पीबॉडी, शौर्य देशमुख, मृदुला शिर्के तर आभार श्रद्धाली घुले यांनी मानले.
