यावल महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन


Science Board inaugurated at Yaval College यावल (12 सप्टेंबर 2025) : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान मंडळाचे उद्घाटन भुसावळ येथील डी.डी.एन.भोळे महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ.डी.एस.राणे यांच्या उपस्थित करण्यात आले.

यांची विचार मंचावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार होते. प्रास्ताविकात उपप्राचार्य डॉ.एच.जी. भंगाळे यांनी निसर्गात आढळणार्‍या गोष्टींचा अभ्यास करणे व त्यांचा शोध घेणे तसेच अद्यावत ज्ञान प्राप्त करणे असे विज्ञान मंडळाचे सांगितले.


प्रमुख वक्ते डॉ.डी.एस.राणे यांनी भावी जीवनासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. यात भविष्यात येणारे आव्हान म्हणजे बेरोजगारी आहे. त्यावर महत्त्वाचा पर्याय म्हणजे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे आहे. त्यासाठी निसर्गातील रहस्य शोधून काढणे महत्त्वाचे आहे असे मार्गदर्शन करताना सांगितले.

प्रा.एम.डी.खैरनार यांनी सभोवतालच्या गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण करून निष्कर्षाच्या अनुभवातून नवीन गोष्ट साधता येते. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. विज्ञानाच्या दैनंदिन जीवनात वापर केला तर भविष्यात त्याचा फायदा होतो, असे प्रतिपादन मार्गदर्शन करताना केले.

सूत्रसंचालन डॉ.आर.डी.पवार यांनी तर आभार डॉ.एस.आर.गायकवाड यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.आर.एस.शिरसाट, प्रा.दानिश शेख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !