यावल न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत 651 प्रकरणात निपटारा : 46.85 लाख वसुल
651 cases settled in National Lok Adalat in Yaval Court : 46.85 lakhs recovered यावल (15 सप्टेंबर 2025) : यावल न्यायालयात शनिवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या पॅनल समोर ठेण्यात आलेल्या दाखल पूर्व तसेच फौजदारी आणि दिवाणी एकूण 4 हजार 107 प्रकरणापैकी 651 प्रकरणांमध्ये तडजोडीने निपटारा करण्यात आला. यात 46 लाख 85 हजार 797 रुपयांचा वसूल झाला आहे. सकाळपासूनच न्यायालयात या राष्ट्रीय लोक अदालत करिता पक्षकारांची व विविध वित्तीय संस्थांच्या अधिकारी वर्गांची गर्दी होती.या लोक अदालतीत प्रथमचं महसुल विभागाच्या थकबाकीरांची दाखल पुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.
सामंजस्याने निपटारा
यावल दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार, 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय लोक अदालतीचे कामकाज विधी सेवा समितचे अध्यक्ष तथा प्रथमवर्ग न्यायधिश आर.एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल प्रमुख सह दिवानी न्यायधिश जी.आर. कोलते पॅनल पंच वकील अॅड.रियाज पटेल, सरकारी वकील अॅड.अनुष्का ए.पाटील होत्या.





651 प्रकरणात निपटारा
या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये नगरपालिका, ग्रामपंचायत, बीएसएनएल, विविध बँका, वित्तीय संस्था व राज्य विद्युत वितरण कंपनीचे बिलांचे दाखल पूर्व प्रकरणे तसेच दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे न्याय प्रलंबित एकूण 4 हजार 107 प्रकरण ठेवण्यात आले होते व या प्रकरणापैकी 651 प्रकरणात निपटारा करण्यात आला व यातुन तब्बल 46 लाख 85 हजार 797 रूपयांचा वसुल झाला आहे. या लोक अदालतीत सकाळ पासुनचं पक्षकारांची गर्दी झाली होती.
यांनी घेतले परिश्रम
स्थानिक वकील संघाचे अध्यक्ष अॅड.जी.एम.बारी, सचिव अॅड.भूषण महाजन, अॅड.नितीन चौधरी, अॅड.खालीद शेख, अॅड.आर.पी.गडे, अॅड.ए.आर.सुरळकर, अॅड.गौरव पाटील, अॅड.रितेश बारी, अॅड.आकाश चौधरी सह संपुर्ण स्थानिक वकील मंडळी व विधी सहाय्यक हेमंत फेगडे, अजय बडे यांच्या माध्यमातून या सर्व दाखल प्रकरणात तडजोेड करिता पुढाकार घेण्यात आला. या संपूर्ण राष्ट्रीय लोक अदालतीसाठी न्यायालयाचे लघू लेखक आर.एस.बडगुजर, आर.व्ही.आमोदकर, एस.आर.तडवी, के. बी.जावळे, एस.एस. पठाण, एम.एस.सोनवणे, एस.एस. झांबरे, बी.बी.काटोले, आर.ए.चौधरी, बी.डी.बागुले, आर.एन.चव्हाण सह आदींनी परिश्रम घेतले.
