भुसावळात नवरात्रोत्सवात यंदा ऑफलाईन अर्ज घेऊन ऑनलाईन भरावा लागणार


This year, during the Navratri festival in Bhusawal, offline applications will have to be submitted and submitted online. भुसावळ (15 सप्टेंबर 2025) : शहरात 22 सप्टेंबर रोजी म्हणजेच अवघ्या 9 दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध दुर्गा मंडळाच्या पदाधिकार्‍यांकडून स्टेज बनविण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 188 मंडळांतर्फे दुर्गामातेची स्थापना केली जाणार आहे, यंदा मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी पोलिस ठाण्यातून अर्ज घेऊन ते अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावे लागणार आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दित 73 तर बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दित 115 अश्या संपूर्ण शहरात 188 मंडळातर्फे दुर्गा स्थापना होणार आहे.

22 रोजी घटस्थापना
शहरात 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार आहे. शहरात दरवर्षी सार्वजनिक दुर्गा मंडळांतर्फे दुर्गामातेची स्थापना केली जात असते. यंदा सुध्दा मंडळाच्या पदाधिकार्‍यांकडून दुर्गामातेच्या मुर्तीसाठी स्टेज तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गणेश विसर्जन झाल्यावर आता मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दुर्गामातेच्या आगमनाचे वेध लागले आहे. यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून कामांना सुरूवात करण्यात आली आहे. स्टेज लावणे, पत्रे टाकणे, पाऊस असल्यास पाणी गळू नये यासाठी वॉटरप्रुप मंडप टाकले जात आहे. यामुळे मुर्तीवर पाणी गळू नये याची काळजी घेतली जात आहे.






पोलिसांकडून परवानगी सुरू
दुर्गोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांकडून सूचना केल्या जात आहे. मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी परवानगी काढण्यासाठी पोलिस ठाण्यात येऊन परवानगीचा अर्ज घेऊन जावा, अर्ज भरून तो अर्ज ऑनलाईन सबमिट करावा आणि भरलेला अर्ज पुन्हा पोलिस ठाण्यात जमा करावा, अश्या सूचना केल्या आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ऑनलाईनच अर्ज घेऊन भरून द्यावा लागत होता. यंदा मात्र, अर्ज ऑफ लाइॅन तर सादर करणे ऑनलाईन करण्यात आले आहे.

पालिकेची नाहरकत लागणार
दुर्गा मंडळांतर्फे ज्या जागेवर स्टेज लावले जाणार आहे, त्यासाठी पालिकेची नाहरकत दाखला लागणार आहे. पालिकेची परवानगी असणे गरजेचे आहे. तसेच जळगाव येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडील नेादणीचे पत्र लागणार आहे, तरच पोलिस प्रशासनाकडून परवानगीची प्रक्रीया पूर्ण होणार आहे. मंडळांकडून ऑनलाईन अर्ज दाखल झाल्यावर तो संबंधित पोलिस ठाण्यात चौकशीसाठी परत येणार आहे, नंतरची ही प्रक्रीया पूर्ण होईल.

येथे असतील दांडीया
दुर्गेात्सवाच्या काळात शहरातील काही ठिकाणी दांडीया खेळले जात असतात, त्यात वाल्मीक चौक, बियाणी स्कूल, आदर्श हायस्कूल प्रांगण, जामनेर रोडवरील गायत्री नगरातील शिवरत्न प्रतिष्ठान मंडळातर्फे दांडीयांचे आयोजन केले जाते. तसेच शहर पोलिस ठाण्याच्या हद्दित शारदा नगर, माणकबाग परिसर, नवप्रतिष्ठान मंडळ, भोई वाडा, वसंत टॉकीज परिसरात दोस्ती मंडळातर्फे दांडीयांचे आयोजन केले जाते, महिला, युवतींचा यात मोठा सहभाग असतेा.

आगमन होते वाजत-गाजत
शहरात बर्‍हाणपूर, यावल, रावेर आदी भागातून दुर्गा देवीच्या मोठ्या मुर्ती येत असतात, या मुर्ती मंडळाच्या पदाधिकार्‍यांकडून ढोल-ताश्याच्या गजरात वाजत गाजत मंडळापर्यत आणत असतात, काही ठीकाणी तर आतापासूनच पदाधिकार्‍यांनी मुर्ती आणल्या आहे. 20 ते 22 या तीन दिवसात सर्वत्र दुर्गा मुर्ती यांना वाजतगाजत स्थापनास्थळी आणतात.

प्रत्येक मंडळाने परवानगी घ्यावी
शहरात ज्या मंडळांतर्फे दुर्गा स्थापना होणार आहे, त्या मंडळाच्या अध्यक्षांनी पोलिस, पालिका प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे, कोणीही विना परवानगीने मंडळाने मुर्ती बसविल्यास कारवाई होईल, पोलिसांकडून प्रत्येक मंडळाची माहिती काढली जात आहे. नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांनी स्वयंसेवकाची नियुक्ती करावी, असे भुसावळचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत म्हणाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !