आमदार अमोल जावळेंच्या पुढाकारातून बामणोद-हंबर्डी रस्त्याचे भूमिपूजन
Groundbreaking ceremony of Bamanod-Hambardi road initiated by MLA Amol Javale यावल (17 सप्टेंबर 2025) : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बामणोद-हंबर्डी या प्रमुख ग्रामीण रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन बुधावर, 17 रोजी मोठ्या उत्साहात झाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच सेवा पंधरवडाच्या पहिल्या दिवशी या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आज पूर्णत्वास गेली.
रस्ता ठरणार जीवनवाहिनी
गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. खड्ड्यांनी भरलेल्या मार्गामुळे ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतमाल वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.. या विकासकामामुळे परिसरातील जनजीवन सुलभ होणार असून हा रस्ता जीवनवाहिनी ठरणार आहे.





आमदार अमोल जावळे यांनी या प्रश्नाचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या रस्त्यासाठी आवश्यक निधी मंजूर झाला आणि आज भूमिपूजनाचा ऐतिहासिक क्षण साकारला.
यांची होती उपस्थिती
या सोहळ्याला ग्रामस्थ, महिला, युवक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरालाल चौधरी, शरद महाजन, प्रभाकर सोनावणे, डॉ.नरेंद्र कोल्हे, भरत महाजन, डॉ.जे.डी.भंगाळे, नितीन चौधरी, प्रभाकर सरोदे, आलिशान तडवी, पिंटू तेली, योगराज बर्हाटे, उमेश पाटील, नारायण चौधरी, दीपक चौधरी, सागर कोळी, उमेश बेंडाळे, गुणवंत निळ, अमोल वारके, प्रशांत सरोदे, जयश्री चौधरी, लता मेढे, पूजा पाटील, डालू चौधरी, भरत पाटील, ज्ञानेश्वर तायडे, सुपडू नेहते, मच्छिन्द्र चौधरी, चंद्रकांत तळेले, अनंता फेगडे, अण्णा भोळे, कुणाल सोनावणे, प्रकाश वाघुळदे, युवराज सोनावणे, नरेंद्र चौधरी, सतीश चौधरी, सुनील चौधरी यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले.
ग्रामविकासासाठी बांधील : आमदार अमोल जावळे
प्रत्येक सामान्य नागरिकाला दिलासा मिळावा आणि ग्रामविकासाला नवी दिशा मिळावी, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे, असे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी यावेळी सांगितले.
