भुसावळातील भोळे महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त निबंध स्पर्धा
हिंदी केवळ मातृभाषा नव्हे तर संस्कृती, एकता आणि ओळख दर्शवणारी भाषा : प्राचार्य आर.पी.फालक
Essay competition on the occasion of Hindi Day at Bhole College, Bhusawal भुसावळ (17 सप्टेंबर 2025) : भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात हिंदी विभाग अंतर्गत ‘हिंदी है हिंद की धडकन’ या विषयावर निबंध स्पर्धा झाली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक होते. प्रमुख अतिथी प्रा.डॉ.संजय चौधरी होते.
ही तर ओळख दर्शवणारी भाषा
प्राचार्य डॉ राजू फालक म्हणाले की, हिंदी ही केवळ आपली मातृभाषा नसून ती आपली संस्कृती, एकता आणि ओळख दर्शवणारी भाषा आहे. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला भारताची राजभाषा म्हणून मान्यता मिळाली. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस आपल्याला आपल्या भाषेच्या गौरवाची आठवण करून देतो. हिंदी ही फक्त संवादाची भाषा नाही, तर भावना जोडणारा पूल आहे. जगातील सर्वाधिक बोली जाणार्या भाषांमध्ये हिंदीचा समावेश होतो, हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपण सर्वांनी संकल्प करूया की आपण हिंदीचा आदर करू आणि आपल्या दैनंदिन जीवनात तिचा वापर वाढवू, असेही ते म्हणाले.





