भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात
Hindi Day celebrated with enthusiasm at K. Narkhede Vidyalaya in Bhusawal भुसावळ (17 सप्टेंबर 2025) : भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात ‘हिंदी दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे व पर्यवेक्षक एस.पी.पाठक, बी.बी.जोगी, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सांगितले हिंदी दिवसाचे महत्व
प्रथम प्रणव वानखेडे याने हिंदी दिवसाचे महत्त्व सांगितले. नंतर इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर गीत प्रस्तुत केले. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी हनुमान चालिसा म्हटली. माही कमोदे हिने सुंदर स्वरचित गाणे म्हटले. बाणाईत या विद्यार्थिनीने हिंदी दिवसाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे यांनी हिंदी दिवसाचे महत्व सांगून सर्वांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.पी.पाठक यांनी हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वैष्णवी सोनवणे, पूर्वा बोरनारे व विजया बावस्कर यांनी केले. यशस्वीतेसाठी पी.एस.पाटील, जी.व्ही.पाटील, एन.ए.नेमाडे यांनी परिश्रम घेतले.





