विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करावा : आमदार अमोल जावळे


Students should use social media properly: MLA Amol Javale भुसावळ (17 सप्टेंबर 2025) : शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करावा. आज सगळीकडे सोशल मीडियाचा प्रभाव आहे. त्याचा चांगल्या कामासाठी विद्यार्थ्यांनी वापर करावा. जीवनात प्रत्येकाने स्वप्न बघितले पाहिजे व त्यासाठी आपल्यातल्या क्षमतांचा योग्य वापर करून मेहनत घेतली पाहिजे, असे मत श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी यावल-रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केले.
भुसावळ येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

यांची विचार मंचावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सोनू मांडे होते. विचार मंचावर संस्थेच्या चिटणीस उषा पाटील, संस्था सदस्य श्रीधर खणके, राजेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापक सुरेश शिंदे, वासंती कुलकर्णी व अलका सुरवाडे उपस्थित होते.






यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनु मांडे यांनी सुद्धा विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. ईशस्तवन व स्वागत गीत अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केले. प्रास्ताविक सुरेश शिंदे यांनी तर संस्थेचा अहवाल वाचन लक्ष्मण वानखेडे यांनी सादर केला.
बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची यादी वाचन पंकज सूर्यवंशी, आशिष निरखे व वैभव पुराणिक यांनी केले.

यावेळी संस्थेच्या महाराणा प्रताप विद्यालयाने राज्य बालनाट्य महाअंतिम स्पर्धेत यशस्वी सहभाग घेऊन पारितोषिक प्राप्त केल्याने झेप या नाटकातील विद्यार्थी कलाकार व शिक्षक यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील भाग्यश्री संतोष ओगले या विद्यार्थिनीने सावली नाटकात यशस्वी भूमिका सादर करून अभिनयाचे पारितोषिक मिळवल्याबद्दल तिचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन योगीराज जोशी तर आभार मुख्याध्यापिका अलका सुरवाडे यांनी मानले. पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. यशस्वीतेसाठी संस्थेच्या तिन्ही शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !